Marathi ukhane - चारोल्या मराठी लग्नतील
Marathi ukhane for bride ,मराठी नावरिसाठी उखाने
1.
भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता ----- रांवाच नाव घेते खास तुमच्या करिता.
2.
अलिकदे अमेरिका पलिकदे अमेरिका
नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका
3.
मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली.
4
गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मेंदी,
....चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी
5.
चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,
..... च्या बरोबर केली सप्तपदी
6.
आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,
....ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी
7.
ओssम या शब्दात आहे दिव्य शक्ती ,
...रावांवर करते मी अमर प्रीती
8.
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.
9.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ---रावानच नाव घेते सोडा माझी वाट
Marathi ukhane - चारोल्या मराठी लग्नतील
Marathi ukhane for bride ,मराठी नावरिसाठी उखाने
10.
मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती,
....रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती
11.
विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची,
..... चे नाव घेउन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची
12.
पुरनपोलि वरण साजुक तूप भातात
--च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात
13.
कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
........नाव घेयला सुरवात केली आजपासून
14.
मंगळसुत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण,
...ची अर्धांगिनी जाहले, भाग्य कुठले याहुन.
15.
रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास
....रावांना भरवते ...चा घास
16.
साँजवात लावताना येते माहेरची आठवण
--- रावांसाठी झाली सासरी पाठवण.
17.
मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती ,
विलासरावांची वाढो सर्वदूर किर्ती
18.
संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले,
प्रत्यक्षात ...... चे आज मी जीवनसाथी झाले.
19.
सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,
....च्या सोबत झाले आताच माझे लग्न
20.
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा
21.
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा